भुबनेश्वर/केओंझर : आपली आई नथी मुंडा हिच्यावर सप्टेंबर 2017 रोजी केओंझर क्षेत्रातील ऊरुमुंडा येथे झालेल्या भयानक हल्ल्याची माहिती सांगताना दुखीनी मुंडा अजूनही थरथर कापतात, त्यांचा आवाज मधूनच तुटतो. माझी आई स्वयंपाक करत होती. मी परसदारी नांगरणी करीत होतो, त्यावेळी मी गलका ऐकला. मी धावत आत आलो आणि पाहतो, तर शेजारच्या खेड्यातील तीन माणसे माझ्या आईला […]