Categories
अभियान

गारपीटग्रस्तांच्या संवादासाठी मानसमित्र अभियान

एप्रिल - २०१४

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व डॉ.नरेंद्र दाभोलकर अध्यासन केंद्र, राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या वतीने, गारपीटग्रस्त बाधीतांशी संवाद करण्याकरिता, स्वतंत्रपणे दीर्घकालीन असे मानसमित्र अभियान परिणामकारक राबविण्यात येईल अशी माहिती महाराष्ट्र विवेक वाहिनीचे राज्य कार्याध्यक्ष डॉ.हमीद दाभोलकर व मानसमित्रचे समन्वयक डॉ.प्रदीप पाटकर यांनी दिली. ते लातूर येथे आयोजित करण्यात आलेल्या मानसमित्र विभागीय प्रशिक्षण शिबीराच्या कृतीकार्यक्रम सत्रामध्ये प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. या समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समितीचे प्रधानसचिव माधव बावगे होते. तर विचारमंचावर ज्येष्ठ पर्यावरणवादी अतुल देऊळगावकर, डॉ.प्रदीप पाटकर, धर्मराज हल्लाळे व बाबा हालकुडे यांची उपस्थिती होती.

यावेळी बोलतांना डॉ.हमीद दाभोलकर म्हणाले की, परिस्थिती कितीही कठीण असली तरी, आत्महत्या हा पर्याय नाही. अशा अप्रिय घटनांच्या प्रतिबंधासाठी, भावनिक उपचार ही अनिवार्य गरज आहे असे त्यांनी सांगितले. मानसमित्र अभियान यशस्वीरित्या राबविण्यासाठी, मानसमित्र समन्वयक समितीचे स्वतंत्रपणे गठन करण्यात आले. त्यामध्ये मानसोपचारतज्ञ डॉ.दिनेश पाटील, डॉ.मिलिंद पोतदार, डॉ.वर्षा पाटील, प्राचार्य अनिरूद्ध जाधव, रामकुमार रायवाडीकर, उत्तरेश्वर बिराजदार, पंढरीनाथ जाधव, अनिल दरेकर, वैजनाथ कोरे, अतुल देऊळगावकर, धर्मराज हल्लाळे, हरिश्चंद्र सुडे, जगदेवी सुगावे, चारूशिला भोसले, माधव बावगे, चन्नाप्पा मुदगर्डे, शिवाजी खादीवाले, मंगल बावगे आदींचा समावेश आहे. तसेच गारपीटग्रस्तांसाठीच्या मदतीसाठी, हेल्पलाईन 7775033750 या नंबरवर स्वतंत्रपणे कार्यान्वित केली आहे. तसेच 9423777051 या भ्रमणध्वनीवरही साहाय्य केले जाणार आहे. मानसमित्र अभियानांतर्गत पुढे बीड, उस्मानाबाद व नांदेड जिल्ह्यात प्रशिक्षणासह मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच 1 एप्रिल ते 7 एप्रिल या दरम्यान स्वत: डॉ.प्रदीप पाटकर त्यांच्या सहकार्‍यांसह गारपीटग्रस्त गावात जाऊन त्यांना भावनिक आधार व प्रबोधन कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच स्वतंत्र अशा एका संवाद यात्रेचेही आयोजन करण्यात आले आहे. यानंतर माजी खासदार गोपाळराव पाटील म्हणाले की, “महाराष्ट्रावरील अशा नैसर्गिक-आर्थिक संकटामुळे शेतकर्‍यांची मानसिक स्थिती कोलमडून गेली आहे. म्हणून त्यांना सामूहिक विश्वास-आधार देऊन, त्यांच्या पाठीशी सप्रयत्न उभे राहणे गरजेचे आहे. आणि त्यासाठी त्यांच्या खंबीर व सशक्त मनोबांधणीचे कार्य मोलाचे आहे आणि ते अंनिस नक्की करू शकते.

अंनिसचे प्रधान सचिव माधव बावगे म्हणाले की, भारतीय अर्थव्यवस्थेचा शेतकरी हा कणा आहे. म्हणून त्याच्या भावनिक संवाद व मनोधैर्यासाठी महाराष्ट्र अंनिसने आपली बांधिलकी, वचनबद्ध केली आहे. प्रारंभी पत्रकार धर्मराज हल्लाळे यांनी आपल्या मनोगतामध्ये मानसमित्र संकल्पना ही अस्वस्थ व उदास शेतकर्‍यांना जगण्याच्या ताकदीचे बळ पुरवणारी आहे. तर यावेळी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश वि.सु.देशपांडे यांनीआपल्या मनोगतामध्ये अशा प्रकरणांना विधीसेवा प्राधिकरणामार्फत सर्व प्रकारचे मोफत सहाय्य उपलब्ध असल्याचे सांगितले.

उद्घाटन सत्राचे सुत्रसंचालन उत्तरेश्वर बिराजदार यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रकाश घादगिने यांनी केले. याप्रसंगी बाबा हलकुडे, अनिल दरेकर, वैजनाथ कोरे, रामकुमार रायवाडीकर, निलेश घरत, मिलिंद सोनकांबळे, प्रा.संभाजी पाटील, महादेवी सोमवंशी, हरिश्चंद्र सुडे, सुशीला खादीवाले, प्रा.सुनंदा मग्गीरवार, दिपाली खरटमोल, पांडुरंग रेडे, प्रा.सुशिला पिंपळे, प्रा.बाबूराव माशाळकर, दिलीप अरळीकर, विजय हिबारे, व्ही.एस.टेंकाळे, मंगल बावगे, शिवाजीराव खादीवाले, गणपतराव तेलंगे, विमल अकनगिरे, सुमती जगताप, ज्योती ढगे, अ‍ॅड.सुरेश सलगरे, गोविंद शृंगीर, संजय व्यवहारे, विश्वनाथ मुडपे, चारूशिला भोसले, जमालपुरे गुरूनाथ, चन्नाप्पा मुदगडे, रमेश माने, जगदेवी बिराजदार, सुरज पाटील, पंढरीनाथ जाधव, प्रा.दत्ता सोमवंशी, मधुकर सुर्यवंशी, हरिभाऊ जवळगे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

बाबा हालकुडे, लातूर