लातूर शाखेने 65 वा आंतरजातीय सत्यशोधकी पद्धतीचा विवाह सोहळा संपन्न केला. क्रीडा संकुलातील बाबासाहेब परांजपे वाचनालयात वधु विद्या वैजनाथ कल्याणकर व वर विवेकानंद संभाजी आर्य यांचा आंतरजातीय सत्यशोधकी पद्धतीचा विवाह पार पडला.
सत्यशोधकी विवाहाची भूमिका माधव बावगे यांनी सांगून प्रास्ताविक केले. तर गोड आवाजात म.फुलेंनी रचलेल्या मंगलाष्टका रूकसाना मुल्ला यांनी गायल्या. वरास शपथ देण्याचे काम सौ.बबिता वाकडकर(पोलीस इन्स्पेक्टर) यांनी केले. वधु-वरास विवाहाचे प्रमाणपत्र लोकमतचे मुख्य उपसंपादक धर्मराज हल्लाळे यांनी दिले. या लग्न सोहळ्याच्या निमित्ताने प्रामुख्याने धर्मराज हल्लाळे, आर.के.पाटील, शाहीन शेख, शिवाजी माढे, शेवाळे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. वधु-वरांनीसुद्धा या विवाहसोहळ्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. हा विवाह सोहळा ज्यांच्यामुळे घडवून आला ते रेणके अरूणकुमार यांचे मनोगत प्रेरणादायी व आठवण ठेवण्यासारखे झाले. सूत्रसंचालन बाबा हालकुडे यांनी तर आभार वैजनाथ कोरे यांनी मानले.
–प्रकाश घादगिने, लातूर