28 जुन 2013 : नाशिक येथे जातपंचायतच्या दबावापोटी आंतरजातीय विवाह केलेल्या प्रमिला कुंभारकरचा तिच्या बापाकडून खूनाची घटना
30 जुन 2013 : सामाजिक संघटनांचा नाशिक येथे भव्य निषेध मोर्चा.
2 जुलै 2013 : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा लेख ‘जाती अंतासाठी हवा वैज्ञानिक दृष्टिकोन’ दैनिक सकाळ मधून प्रसिद्ध.
3 जुलै 2013 : लेख वाचून भटके जोशी समाजाच्या बहिष्कृत केलेल्या अण्णा हिंगमिरे यांच्या महाराष्ट्र अंनिसकडे धाव.
4 जुलै 2014 : अण्णा हिंगमिरे यांची राजकीय दबावाला झुगारून पोलीसांत तक्रार दाखल
6 जुलै 2013 : नाशिकमध्ये जातपंचायतच्या मनमानी विरोधात महाराष्ट्र अंनिसचा मोर्चा.
7 जुलै 2013 : बहिष्कृत व्यक्तींनी महाराष्ट्र अंनिसकडे संपर्क करण्याचे आवाहन दै.सकाळ चे समुह संपादक उत्तम कांबळे यांनी केले.आवाहनाला प्रचंड प्रतिसाद.राज्यभरातुन पिडीतांचा टाहो. बहुतांश जातीत जातपंचायतचे अस्तित्व असल्याचे स्पष्ट.
9 जुलै 2013 : डॉ. दाभोलकर व राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांची ’जातपंचायत मूठमाती अभियान’ चालवण्याची घोषणा.
10 जुलै 2013: पुणे काँग्रेस चे पदाधिकारी व श्रीगौड ब्राम्हण समाजाचे काका धर्मावत यांची तक्रार महाराष्ट्र अंनिसच्या मदतीने दाखल.राज्यात आश्चर्य व्यक्त.
11 जुलै 2013: मुंबई उच्च न्यायालयाने जातपंचायतीमुळे राज्य घटने समोर आव्हान असल्याचे म्हटले.
2 ऑगस्ट 2013: जातपंचायत या घटनाबाह्य असे मुंबई उच्च न्यायालयाकडून मत प्रगट.
8 ऑगस्ट 2013 : नाशिक येथे पहिल्या जातपंचायत मूठमाती परिषद मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ नागनाथ कोतापल्ले यांच्या उपस्थितीत.राज्यभरातुन पीडितांनी मांडले दाहक अनुभव.
15 ऑगस्ट 2013 : दुसरी जातपंचायत मूठमाती परिषद लातूर येथे.उत्तम कांबळे, बाळकृष्ण रेणके,उचल्याकार लक्ष्मण गायकवाड यांच्या उपस्थितीत बहिष्कृतांचा प्रचंड प्रमाणात प्रतिसाद.
20 ऑगस्ट 2013: डॉ नरेंद्र दाभोलकर यांचा पुण्यात भरदिवसा निर्घृण खून.
28 ऑगस्ट 2013: सातारा येथील अभिवादन परिषदेचे जातपंचायत मूठमाती अभियान जोमाने चालू ठेवण्याचा संकल्प.
8 सप्टेंबर 2013: तिसरी नियोजित जातपंचायत मूठमाती परिषद जळगाव येथे. राज्य कार्यध्यक्ष अविनाश पाटील यांच्यासह अॅड.पल्लवी रेणके, अॅड असीम सरोदे यांचे बहिष्कृत कुटुंबीयांना मार्गदर्शन.
2 ऑक्टोबर 2013 : मुंबईच्या जोगेश्वरी येथील वैदु जातपंचायत कडून पत्रकार विलास बढे यांना मारहाण.
17 सप्टेंबर 2013: मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश-जातपंचायत विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करा व चार आठवड़यात कारवाई बाबत निर्णय घ्यावा.
30 सप्टेंबर 2013: गृह विभागा कडुन एक परिपत्रक जारी. भारतीय दंड विधान संहितेच्या विशिष्ठ कलमांचा आधार घेऊन तक्रार दाखल करून घेण्याचे पोलीसांना आदेश.
30 डिसेंबर 2013: माळेगाव (जि.नांदेड ) येथील यात्रेत अनेक जातपंचायती कडुन अनिष्ट प्रथांना मूठमाती देण्याचा निर्णय.
27 मार्च 2014 : भटक्यांची पंढरी असलेल्या मढी(जि.अहमदनगर) येथील यात्रेत बसणार्या बहुतेक जाती पंचायती रद्द आणि बसलेल्या काही जात पंचायतींकडून विधायक निर्णयांची चर्चा.
28 एप्रिल 2014: जोगेश्वरी येथील वैदु जातपंचायत बरखास्त करण्यासाठी संपादक ज्ञानेश महाराव, माधव बावगे आणि कृष्णा चांदगुडे यांच्या संवादाने सामाजिक सुधारणा मंडळात रुपांतर. महिलांना निम्मे प्रतिनिधीत्व.
27 जुलै 2014: महाराष्ट्र अंनिस व तरुणांच्या मदतीने अहमदनगर येथील पद्मशाली जातपंचायत बरखास्त.
9 सप्टेंबर 2014: महाराष्ट्र अंनिसच्या मदतीने चंद्रपूर येथील आदिवासी गौड जातपंचायत बरखास्त.
25 डिसेंबर 2014: महाराष्ट्र अंनिस व मानवाधिकार संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने सांगली येथील कोल्हाटी डोंबारी जातपंचायत बरखास्त.
3 फेब्रुवारी 2015: सामाजिक बहिष्कार टाकणार्यांना त्वरित अटक करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश.
8 फेब्रुवारी 2015: महाड येथे चौथी जातपंचायत मुठमाती परिषद. डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था समवेत झालेल्या परिषदेत गावकीने वाळीत टाकलेल्या ऐंशी कुटुंबीयांना मिळाली लढण्याची हिंमत.
10 मार्च 2015: मढी येथील भटक्या विमुक्त समाजाच्या यात्रेत बसणार्या जात पंचायतींच्या कामकाजाबाबत सर्वेक्षण.
12 मार्च 2015: जातपंचायत विरोधी कायदा तीन महिन्यात करण्यार असल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा.
14, 15 मार्च 2015: धुळे येथे ज्येष्ठ विधीज्ञ निर्मलकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात जात पंचायत विरोधी कायदा मसुदा निर्मितीची चर्चा.
16 मार्च 2015: राज्यातील सर्वोच्च वैदु जातपंचायत बरखास्त… महाराष्ट्र अंनिस व प्रसारमाध्यमांच्या प्रयत्नांना आले यश…महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणांच्या इतिहासात महत्वाचे पाउल.
20 मार्च 2015: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कडून महाराष्ट्र जातपंचायत कार्यवाही प्रतिबंधक अधिनियम-2015 हा कायद्याचा मसुदा मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मुंबई येथे सादर.
जातपंचातीविरोधात आवाज उठवा!
आपल्या गावात एखाद्या कुटुंबाला जातपंचांनी किंवा गावकी-भावकीने बहिष्कृत केले असल्यास त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आपण दक्ष रहा. याबाबत ताबडतोब महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क साधा.
–कृष्णा चांदगुडे,
संयोजक, महाराष्ट्र अंनिसचे जातपंचायत मुठमाती अभियान
संपर्क : 982263037