मांढरदेवी यात्रा काळात मांढरदेवी येथील पद्मावती मंदिरात बसून रांजणगाव मशिद, ता.पारनेर, जि.अहमदनगर येथील साहेबराव शिंदे हा मांत्रिक भाविकांना शारीरिक आजार, घरगुती अडचरी, करणी अशा प्रकारावर स्वत:च्या हातातील काठी व लिंबू याच्या सहाय्याने थेट काळूबाईशी बोलून, उपाय सांगून, लुबाडत होता. समितीच्या भास्कर सदाकाळे व मच्छिंद्र वाघ या कार्यकर्त्यांनी त्याचा भांडाफोड केला. त्याने ‘हे सर्व खोटे होते. केवळ पैसे मिळवण्यासाठी हे सर्व करत होतो. पुढे कधीही असे करणार नाही.’ असा माफीनामा लिहून दिला.
– प्रशांत पोतदार, सातारा