Categories
कविता

माणूस

वार्षिकांक - २०१९

“सारे धर्मग्रंथ वाचले

पानं चाळताना फक्त

एवढीच चूक झाली

बोटाला जिभेवर न्यावं लागलं

मी धर्माला थुक्का लावला

आणि मी माणूस झालो.

दिवाळीला घर रंगवताना

रंगांचीच फार भीती वाटली मला

लोकं हरामी घराचा रंग बघून

माणसाची जात ठरवतात

म्हणून मी सगळं घरच

पांढरंशुभ्र केलं

मी जातीला चुना लावला

आणि मी माणसात आलो.”