महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पिंपरी चिंचवड शाखेला वीस वर्षे पूर्ण झाली. या द्विदशकपूर्तीच्या निमित्ताने त्या शाखेने ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ या विषयावरील पहिले साहित्य संमेलन आयोजित केले होते. त्या संमेलनाच्या प्रास्ताविकात संमेलनाचे उद्दिष्ट सांगताना डॉ. दाभोलकर म्हणाले होते, “राज्यभर इतर अनेक साहित्य संमेलने भरत असतात. त्या संमेलनांसारखेच हे संमेलन भरवावे अशी आमची अजिबात इच्छा नाही. या समाजव्यवस्थेत प्रश्न विचारणारी नवी पिढी निर्माण व्हावी. माणसाला अमूल्य अशी बुद्धी मिळाली आहे. तिचा पुरेपुर वापर करून त्याने विवेकी विचाराच्या समाजाची निर्मिती करावी हेच या साहित्य संमेलनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. ” या उद्दिष्टाला प्रतिसाद देत त्या संमेलनातील मान्यवरांनी आपल्या भाषणातून जे विचार मांडले ते अंनिवाच्या वाचकांसाठी आम्ही देत आहोत. या सर्व भाषणांचे शब्दांकन सुमन ओक यांनी केलेले आहे.
डॉ. नागनाथ कोत्तापल्ले (लेखक व अ.भा. साहित्य संमेलनाध्यक्ष),
डॉ. सदानंद मोरे (संत साहित्याचे अभ्यासक),
निरंजन घाटे (विज्ञान लेखक),
उत्तम कांबळे (संपादक, लेखक व अ.भा. साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष),
दत्ता देसाई (लोकविज्ञान चळवळीचे कार्यकर्ते)