ठाणे अंनिसने 27 मे रोजी लोढा हेवन स्मशान भूमीस कार्यकर्त्यांसह भेट देवून भूताबद्दलचा गैरसमजुती दूर केल्या. रात्री 11 वाजता सर्व कार्यकर्त्यासह आम्ही सर्व स्मशानाकडे प्रस्थान केलं. ज्येष्ठ पत्रकार आणि वारकरी संप्रदायाचे श्यामसुंदर महाराज सोन्नर, वंदनाताई शिंदे, रामचंद्र इनामदार सर, सुलभा कांबळे, नगरसेवक उमेश बोरगावकर, माजी नगरसेवक नंदू मालवणकर, नवनाथ लोखंडे, शहीद भगतसिंग मित्र मंडळाचे कॉ. आवारे, नामवंत दंत सर्जन डॉ.राहूल कांबळे, भारताचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांचे जवळचे सहकारी एन.बी. देशमुख, प्रा.प्रमोद वानखडे, तसेच महाराष्ट्र वैदू विकास परिषदेची दुर्गा शिर्के ही 113 कार्यकर्त्यांना घेवून सहभागी झाली होती. या कार्यक्रमास डॉ. सुहास शिंगारे, प्रा. प्रकाश पारखे, गणेश चिंचोले, संजय सावरकर अशी सर्व नामवंत मंडळी आवर्जून उपस्थित होती.
वरील स्मशान भेटीस मिळालेला उदंड प्रतिसाद पाहता अशा प्रकारच्या उपक्रमांची समाजाला किती प्रचंड गरज आहे याची प्रचिती येते. या कार्यक्रमासाठी वृत्तपत्रांनी आणि टी.व्ही. चॅनेल्सनी भरभरून प्रतिसाद दिल्यामुळे कार्यक्रम संदर्भात अनेकांचे सारखे फोन येतच होते.
– प्रा. प्रविण देशमुख, ठाणे