Categories
कविता

कार्यकर्त्यांच्या कविता

वार्षिकांक - २०१७

माझा पत्ता (अमृता प्रीतम) आज मी घरक्रमांक पुसला आहे आणि गल्लीच्या शिरोभागावरील गल्लीचे नाव हटवलेय आणि, प्रत्येक सडकेच्या दिशादर्शक नावावर रंग फासलाय कुणालाही कळू नये म्हणून पण, जर तुम्हाला मला भेटायचंच असेल तर, जगातील सर्व देशांत, सर्व खंडांत सर्व शहरांतील सर्व गल्ल्यांतील सर्व दारांवर थाप द्या……. असेल हा एक शाप वा वरही असेल! जेथे स्वच्छंदी-निर्भय-निर्धारी […]

Categories
कविता

। पोवाडा दाभोलकरांचा।

ऑगस्ट - २०१७

दाभोलकर विवेकसूर्य दिले त्यांनी धैर्य, गाजवू आम्ही शौर्य! महाराष्ट्र भूमी संतांची, सुधारकांची, विचारवंतांची, ज्यांनी कृतीचा मार्ग दाविला – (2) मानवा शोषणमुक्त केला – (2) जागविली समतेची ती जाण – (2) सर्वांना दिला आत्मसन्मान – (2) धर्म मानवकेंद्री करून जी… जी, जी वंदन करू बुद्धाला ….(2), चार्वाकाला, बसवण्णांना, संत कबीराला (2) तुकाराम, गाडगेबाबांच्या शिकवणुकीला जी रं […]

Categories
कविता

१६ कविता

वार्षिकांक - २०१६

मीच घेतो कट्टी…!! (… पुन्हा एकदा) का रे विठुराया कैसा तुझा न्याय उभा हातपाय बांधोनिया ? युगे अठ्ठावीस अजूनही मुका तुझ्या किती चुका माफ करू ? सांग किती करू वारी – उपवास गळ्यातला फास सुटेचिना ! दुबार पेरणी जन्माचा दुष्काळ काय तुझी माळ चाटायाची ? वैतागलो बाबा धावा करू करू कैसा तुझा धरू भरवसा ? […]

Categories
कविता चळवळ

गाजलेले कविसंमेलन

जून – २०१६

‘सावध हो देवा, बघ राधे माँ आली’ उपरोधिक आणि अस्वस्थ शब्दांनी वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ विचारवंत कवी श्यामसुंदर सोन्नर महाराजांच्या अध्यक्षतेखाली व नीलम माणगावे यांच्या सूत्रसंचालनाने काव्यसंमेलनास बहर आला. मनोहर जायभाये (अंबाजोगाई) यांनी श्यामसुंदर सोन्नर महाराजांची ओळख करून दिली. कृष्णात कोरे (कोल्हापूर) यांच्या ‘डॉक्टर पुन्हा एकदा वीस तारीख आली’ या कवितेने डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनानंतर अस्वस्थ […]

Categories
कविता

सोन्याची साखळी

मार्च - २०१६

बुवा सामान्यांना गंडा दोरा आणि मुख्यमंत्र्यांच्या सौ.ना मात्र सोन्याची साखळी देतात. या बुवांनी सगळ्यांनाच सोन्याच्या साखळ्या वाटल्या तर किती बरं होईल! खरंतर मुख्यमंत्री साहेबांनी या योजनेत लक्ष घालायला पाहिजे. या भावना व्यक्त करणारी कवी/वक्ते जगदीश ओहोळ यांची परखड कविता. ‘सोन्याची साखळी’ जिवाला आमच्या काळजी आहेपिण्याच्या पाण्याचीमुख्यमंत्री साहेब आम्हाला बी मिळंल का?साखळी ती सोन्याची..॥1॥आम्हाला बी आवड […]

Categories
कविता

राधे माँ आली

वार्षिकांक - २०१५

राधे माँ आलीसजवून अंग अंग ओठास थापली लालीसांभाळ तू स्वत:ला देवा राधे माँ आलीझगमगीत फॅशन करूनी तालात थिरकती पायभजनाचा सोडून ठेका सिनेमाचे गाणे गायशालीनता सोडून सारी शृंगार रसामध्ये न्हालीसांभाळ तू स्वत:ला देवा राधे माँ आलीनखरे तिचे अफाट भक्तास भासती लीलाबघ इथे तुझ्या श्रद्धेचा बाजार कसा हा झालासोडून स्वर्ग तू देवा बघ येऊन एकदा खालीसांभाळ तू […]

Categories
कविता

१७ कविता

वार्षिकांक - २०१५

जात पंचायत जात जागी झाली आतापंचांची पंचाईतआता तुमच्या फतव्यांनाआम्ही नाही जुमानीत किती सोसावा जुलूममाझ्याच जातीमंदीअशी कशी ही गुलामीमाझ्याच मातीमंदीनाही सोसवत आतातुमची ही हुकूमतआता तुमच्या फतव्यांनाआम्ही नाही जुमानीत जिथे जपायाचे नातेतेच वाळीत टाकितीपंचपणाचा अहंकारमाना-पानात झोकितीढोंग किती दिवस असंबसायाचे गोंजारीतआता तुमच्या फतव्यांनाआम्ही नाही जुमानीत जात सोडून जराशीबघा माणूस होऊनफाटला समाजगीत समतेचे गाऊनकिती लोळत पडावेभेदाभेदाच्या घाणीतआता तुमच्या फतव्यांनाआम्ही […]

Categories
कविता बालविभाग

भूत दिसते पाहू या।

वार्षिकांक - २०१५

चला, आपण गाऊ या। भूत दिसते पाहू या।बटबटीत डोळे, दात पुढे। थयथय नाचती पाहू या। जुनी हवेली, पडका वाडा। वेशीवर भूत पाहू या।अंडे, लिंबू, रोट, उतारा। खरंच खातात का पाहू या। भगत, बाबा भूत बांधती। यातील सत्य पाहू या।भूत झपाटते, अंगात येते। कसे होते ते पाहू या। दुबळे मन आजारी पडते। काय होते ते पाहू […]

Categories
कविता

माझ्या बापाची अंत्ययात्रा…

एप्रिल - २०१५

तू माझ्या बापाच्या अंत्ययात्रेस होतास काय…..? वेळ नव्हता म्हणतोस! हो असेलही खरं…. नाहीतरी कुठे असतो वेळ तुला अशा ‘किरकोळ’ घटनांकडे लक्ष द्यायला! माझा बाप जेव्हा मोलकरणींसाठी रस्त्यावर उतरायचा तेव्हाही तू असायचास तुझ्या महत्वाच्या कामात ‘बिझी’ मोलकरणींचं काय घेऊन बसायचं त्यांना दोन वेळचं खायला मिळतंच की! माझा बाप जेव्हा कामगारांचा आवाज बनून भांडवलशाहीवर हल्ला बोलायचा तेव्हाही […]

Categories
कविता

कविता

वार्षिकांक – २०१४

सूक्ष्म वा विशाल अभ्यासून तथ्य फोडतसे मिथ्यज्ञानपंथ। विज्ञान पंथानेचौफेर निघतीयाने यात्रेसाठीअंतरिक्षी। मंगळ ग्रहालालाभली की थेटभारताची भेटयानरूपी। पितरांच्या दिशीमंगळ ग्रहालाकवेत घेतलाविज्ञानाने। -प्रदीप वैद्य, गडचिरोली देवळांचा धर्म कोणाला काय सत्यगवसते हे त्यांच्यासहवासात कळते।आम्ही देवळं व धर्मापासून दूर राहिलोहे आज सांगतो॥देवळं आज मोठमोठीसंपन्न पावन झाली, आणि देव मानणारा करोडपती दिसतो।आम्हाला देव पावणारकी आम्ही देवाला पाहणारअसा प्रश्न करतो।माणसानं देव […]