Categories
पर्दाफाश

सातारा अंनिसने केला विठ्ठल महाराजाचा पर्दाफाश!

ऑक्टोबर - २०१२

ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मार्गावर, फलटण तालुक्यात तरडगाव नावाचे मोठं गाव आहे. त्याच्या लगतच्या मौजे शिंदे माळ या गावात विठ्ठल सगोबा शिंदे नावाचा भोंदूबाबा प्रसिद्धीस आला. पिठाच्या गिरणीवर काम करणारा तो साधा कामगार होता. त्याने बुवाबाजीच्या मोठ्या मिळकतीतून पूजाविधीसाठी मोठा हॉल बांधला आहे. देवदेवतांच्या तसबिरींनी तो सजवला आहे. दारात स्वत:च्या तीन गाड्या उभ्या आहेत. दर अमावास्या […]

Categories
अंधश्रद्धा पर्दाफाश

दिव्यदृष्टी प्राप्त करून देणार्‍या ‘माईंड पॉवर ट्रेनर’चे पलायन

सप्टेंबर - २०१२

            ‘झी जागरण’ या दूरचित्रवाणीवर दररोज सकाळी 7.20 मिनिटांनी व 11.20 मिनिटांनी अहमदाबादच्या स्नेह देसाईंचा कार्यक्रम असतो. तीस वर्षीय देसाईने परदेशातील वेगवेगळ्या ठिकाणाहून अभ्यास केला आहे. तो माईंड पॉवर ट्रेनर आहे. रेकी, ज्योतिष, फेंगशुई, वास्तू, टॅरो कार्ड या सर्वांचा त्याचा अभ्यास आहे. परंतु सर्वात महत्वाचे म्हणजे माणसाचा तिसरा डोळा जागृत करून दिव्यदृष्टीची जाणीव करून देणे […]

Categories
पर्दाफाश

दत्त अवतार माळी बाबाची अंनिसपुढे शरणागती

जुलै - २०१२

गेली 15 वर्षे महाराष्ट्रातील जनतेला शनी देवाची कवचकुंडल व डायरेक्ट ऑथोराईज्ड कनेक्शने जोडणारा भोंदू शिवाजी माळी अखेर अंनिसपुढे शरण आला. येडं-उपाळे(मायणी) येथे राहणारा व माजी सैनिक असलेला शिवाजी माळी हा स्वत:ला स्वयंघोषित दत्त अवतार मानत असे. दर गुरूवारी व रविवारी मोठा दरबार भरवून भक्तांच्या कौटुंबिक, आर्थिक, मानसिक समस्या पत्रिकेच्या सहाय्याने डायरेक्ट शनीदेवाला कॉन्टॅक्ट करून सर्व […]

Categories
पर्दाफाश

राहुरीत भोंदूबाबाचा पर्दाफाश

जुलै - २०१२

बनावट ग्राहक पाठवून राहुरी तालुका अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी दत्तनगर(राहुरी) येथील विजय बागूल या भोंदूबाबाचे स्टींग ऑपरेशन केले. मला काहीही चमत्कार येत नसून यापुढे लोकांना फसविणार नाही, असे लेखी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी राहुरी पोलीस स्टेशनमध्ये बाबाकडून लिहून घेतले. तसेच अनेकांची फसवणूक केल्याची कबुली बाबाने दिली.             विजय भीमराज बागूल(वय 39) हा मूळचा उक्कलगाव(ता.श्रीरामपूर) येथील रहिवाशी असून […]

Categories
पर्दाफाश

पवनी येथील ताज मेहंदीबाबाचा भांडाफोड

जून – २०१२

            भंडारा जिल्ह्यातील बीड सीतेपार या गावात काही वर्षांपूर्वी ‘ताज मेहंदी’ या नावाने मुस्लीम व्यक्ती दरबार भरवित असे. या ताजमेहंदीबाबाला ऐन दिवाळीच्या दिवशी अंनिसचे कार्यकर्ते विष्णूदास लोणारे यांनी आव्हान देऊन भक्तांच्या समुहासमोर पोलिसांच्या स्वाधीन केले होते. नंतर हा ताजमेहंदी बीड सीतेपारला फिरकला सुद्धा नाही. पण त्याच्या भक्तांनी या ताजमेहंदी बाबाला त्याच्या मृत्यूनंतर दैवी अवताराचे स्थान […]

Categories
पर्दाफाश

रक्त पिणारे भूत

जून – २०१२

          केरळमधील प्रख्यात बुद्धिप्रामाण्यवादी व अंधश्रद्धा विरोधी लढ्यातील अग्रणी दिवंगत बी.प्रेमानंद यांनी एका भुताटकीच्या विलक्षण प्रकारामागचा बनाव जीव धोक्यात घालून कसा उघडकीस आणला त्याची ही हकीकत.             भोंदूबाबांच्या चमत्कारांचे प्रात्यक्षिकांसहित स्पष्टीकरण या विषयावर अंधश्रद्धाविरोधी चळवळीतील कार्यकर्त्यांसाठी एक कार्यशाळा हैदराबाद येथे मी आयोजित केली होती. त्यावेळी अनंतपूर जिल्ह्याचे पोलीस अधिकारी मला भेटावयास आले. या जिल्ह्यातील उर्वाकोंडा […]

Categories
पर्दाफाश

राजगुरूनगरमध्ये भोंदूबाबाचा पर्दाफाश

मे - २०१२

राजगुरूनगर येथील नेहरू चौकात भोंदूगिरी करणार्‍या महेशकुमार जोशी या भोंदूबाबाचा ‘अंनिस’ने पर्दाफाश केला.             राजगुरूनगर येथील नेहरू चौक या ठिकाणी राजस्थान येथील महेशकुमार जोशी याने आपले दुकान मांडून पत्रकाद्वारे प्रसिद्धी केली हेती. लग्न जुळवणे, कलह दूर करणे, प्रेमप्रकरणी मार्गदर्शन करणे, दारू सोडवणे, भविष्य सांगणे यासाठी पाच हजार हा या बाबाचा दर होता. मात्र, त्यात ग्राहक […]

Categories
पर्दाफाश

भोंदूबाबाचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून पर्दाफाश

मे - २०१२

नेवासा(जि.नगर) येथील सिटी सर्व्हे कार्यालयात अनेक दिवसांपासून भोंदूगिरी करणार्‍या बाबाचा अंनिसच्या कार्यकर्त्यांनी नुकतात पर्दाफाश केला.             कधी सुरेशनगर, तर कधी नाशिक येथील रहिवाशी सांगत अर्जुन शिंदे नावाचा बाबा गेल्या अनेक दिवसांपासून नेवासा फाट्याजवळील भूमी अभिलेख कार्यालयात येऊन सुखशांती देतो, असे सांगत होता. सिटी सर्व्हे कार्यालयातील काही अधिकारी व कर्मचार्‍यांकडून या बाबाने बर्‍याचवेळा पैसेही उकळले. या […]

Categories
पर्दाफाश

 लिंबू टाचण्यांची भीती

एप्रिल - २०१२

            नाशिकच्या पांडवलेणी ह्या डोंगराच्या पलिकडच्या बाजूस अर्धवट बांधकाम झालेली शासकीय वसाहत आहे. शेजारीच अमेय सोसायटी ही कामगारांच्या आठ-दहा घरांची वसाहत आहे. आजूबाजूस दोन कि.मी.पर्यंत दिवसाही सुनसान असतं. ती शनिवारची रात्र साधीसुधी फक्त अमावस्येची नव्हती तर शनिआमावास्येची होती. जे काही घडलं ते झोपेसून उठल्यावर रहिवाशांना कळाले. सुरेश भानोसे व मंगेश गायखे हे दोघेही रात्रपाळी असल्यामुळे […]

Categories
पर्दाफाश

सावळजमध्ये भोंदू महिलेचा पर्दाफाश

एप्रिल - २०१२

सावळज(ता.तासगाव) येथे राहणार्‍या आणि भोंदूपणा करून लोकांची फसवणूक व लुबाडणूक करणार्‍या नयना उमाजी जाधव या महिलेचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी पर्दाफाश केला. तिने पोलिसांसमोर लोटांगण घेऊन गाव सोडून जाण्याची तयारी दर्शविली.             परगावाहून येऊन कुटुंबासह वास्तव्यास आलेल्या नयना जाधव (मूळ गाव कुटवाड, ता.माण, जि.सातारा) हिने काही दिवसांपासून सावळज येथे भोंदूगिरी करीत आपले बस्तान बसविले होते. […]