Categories
पर्दाफाश

देवी रडल्याचा चमत्कार : महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांनी केला पर्दाफाश…!

ऑक्टोबर - २०१८

जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे चंचल वाघमारे नावाच्या व्यक्तीच्या घरी महालक्ष्मी मूर्तींची स्थापना करण्यात आली होती. स्थापना केल्यानंतर मूर्ती रडत असल्याचे शेजारील काही व्यक्तींनी वाघमारे यांच्या लक्षात आणून दिले. त्यांनी आपल्या जवळच्या मित्रांनाही देवींच्या मूर्ती रडत असल्याच्या चमत्काराबाबत सांगितले. या चमत्काराची बातमी बघता-बघता भोकरदन व पंचक्रोशीत वार्‍यासारखी पसरली. भाविकांची गर्दी होऊ लागली. अनेकजण मूर्तींसमोर पैसे टाकू […]

Categories
पर्दाफाश

नेपाळीबाबाच्या चमत्काराचा पर्दाफाश

ऑक्टोबर - २०१८

मी संगीता गणेश पांढरे. मी गोरेगावच्या संस्कारधाम महाविद्यालयाची वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी आहे. मालाड पूर्वमधील आंबेडकरनगर येथील पिंपरीपाडा या वस्तीत माझ्या आईबरोबर राहते.वस्तीतील माणसे अंधश्रद्धेच्या खूप आहारी गेली आहेत. येथे बर्‍याच बाबा-बुवांची ये-जा चालू असते. आमच्या वस्तीत पूर्वीपासून एक नेपाळी बाबा राहतो. मी त्याला लहान असल्यापासून माझा ‘दादा’ असे मानते. तो मला नेहमी भूत-प्रेताच्या गोष्टी सांगतो. […]

Categories
पर्दाफाश

नागपूरच्या शस्त्रधारी भोंदूबाबाचा पर्दाफाश

सप्टेंबर - २०१८

समाजात अस्थिरता निर्माण करणार्‍या एका भोंदूबाबाचा खापरखेडा पत्रकार संघ व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मदतीने खापरखेडा पोलिसांनी मोठ्या शिताफीने गुरुवारी, 19 जुलैला रात्रीच्या सुमारास भोंदूबाबाच्या ठिकाणावर छापा टाकून पर्दाफाश केला. ही घटना स्थानिक पोलीस स्टेशन हद्दीत भानेगाव येथे घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित भोंदूला खापरखेडा पोलिसांनी विविध कलमांन्वये अटक केली असून त्याच्याकडून […]

Categories
पर्दाफाश

कोल्हापुरात भोंदू डॉक्टरचा अंनिसने केला पर्दाफाश…

जुलै - २०१८

‘मुलगाच होईल’ असे सांगून फसवणार्‍या भरत जिनगोंडा पाटील यास (हलोंडी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) पोलीस प्रशासनाने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तक्रारीवरून महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम 1961 च्या 32 (2) व 33 (अ) या कलमाखाली गुन्हा नोंदवून अटक केली. महाराष्ट्र अंनिस, कोल्हापूर शाखेच्या बुवाबाजीविरोधी कार्यवाह गीता हासूरकर कोल्हापूर-सांगली रस्त्यावरून निघाल्या असताना त्यांनी ‘हमखास मुलगाच होईल’ अशा […]

Categories
पर्दाफाश

शेवटी आसारामबापूंना तहहयात शिक्षा, तथाकथीत आध्यात्मिक गुरुपरंपरेचा पर्दाफाश!

मे - २०१८

आसारामबापूंच्या विरुद्ध 6 ऑगस्ट 2013 रोजी आरोपपत्र दाखल झाले होते. त्यात कलम 8 नुसार पॉकसो कायदा (Protection of Children from Sexual Offences ­Act) आणि भारतीय दंड संहिता कलम 342, 376, 506 , 509 नुसार तसेच ज्युवेनाईल जस्टीस अ‍ॅक्ट या कायद्यांप्रमाणे कलम 23 व 26 अंतर्गत गुन्हा नोंदविला होता. त्यातील तरतुदींनुसार मरेपर्यंत जेल जन्मठेप अशी शिक्षा […]

Categories
पर्दाफाश

मुलगाच देणारी अनुबाई, गर्भहत्या करणार्‍या पिटूला कोल्हापूर अंनिसचा दणका

जुलै - २०१७

सौ. अनुबाई केरबा सरनाईक रा. गिरगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर ही महिला गरोदर असणार्‍या महिलांना मुलगाच व्हावा म्हणून उपचार करीत होत्या. त्यासंदर्भात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, कोल्हापूर शाखेकडे निनावी तक्रार आली. ही महिला गरोदर राहिलेल्या महिलेस दीड महिना झाल्यावर फुलांच्या कळ्या, अंगारा खायला द्यायची. तसेच डॉक्टरांकडे न जाण्याचा सल्ला द्यायची. त्याचप्रमाणे करणी, भुताटकी, लागीर झालेले […]

Categories
पर्दाफाश

ट्रकचालकांना भीती दाखवून पैसे उकळणारा महाराज गजाआड

एप्रिल – २०१७

आपला धंदा कुठे चांगला चालेल हे धंदेवाईक व्यक्तीला बरोबर समजते! भोंदूबाबा देखील त्या अपवाद नाहीत. मोहन आप्पाराव भिंगोले या मुंबईतील एका खाजगी आस्थापनेत नोकरी करणार्‍या गृहस्थांना त्यांनी कोठे गाठले बघा! मालवाहतुकीचा जोडधंदा करण्यासाठी म्हणून भिंगोले यांनी ट्रक विकत घेतला होता. बाळू बिराजदार यास वाहनचालक म्हणून नोकरीला ठेवले होते. निगडी येथे हा ट्रक उभा असताना त्या […]

Categories
पर्दाफाश

घरावर दगडे पडणार्‍या भानामतीचा भांडाफोड

फेब्रुवारी – २०१७

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात, नितीन राऊत यांच्या पाठपुराव्यातून 2015 साली महाराष्ट्र अंनिसची शाखा सुरू झाली. समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्याची इच्छा असणार्‍या व्यक्तींना एक कृती मंच उपलब्ध झाला. डिसेंबर 2016 मध्ये खेड शाखेने भानामतीची एक घटना यशस्वीपणे हाताळली व लोकांच्या मनावरील भीतीचे मळभ दूर केले. खेड तालुक्यातील मेटे भोईवाडी येथील श्री. संदीप यशवंत जाधव यांचे घर […]

Categories
पर्दाफाश

फसवणूक करणार्‍या भोंदू पती-पत्नीचा सातार्‍यात पर्दाफाश

ऑगस्ट - २०१५

मुलगा होईल, अशी आशा दाखवून महिलेची आर्थिक फसवणूक करणार्‍या भोंदू पती-पत्नी आणि त्यांना मदत करणार्‍या जावेचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पर्दाफाश केला. भोंदू दाम्पत्यावर फसवणूक केल्याप्रकरणी नरबळी, इतर अमानुष अनिष्ट आणि अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन कायद्यांतर्गत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पीडितेच्या जावेवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिन्यांपूर्वी नंदा विठ्ठल […]

Categories
पर्दाफाश

गुलाबजामुन मागणारी भानामती

मार्च - २०१५

पाटील यांच्या घरी नोव्हें 2014 पासून भानामतीचे प्रकार सुरू झाले. प्रथम जेवणामध्ये मीठ जादा पडणे, भांड्यामध्ये ठेवलेले दूध जमिनीवर सांडणे, जेवणामध्ये रक्त दिसणे, यासारखे प्रकार होऊ लागले. काही दिवसांनी पाटील यांच्या मुलीस पांढरी साडी नेसलेली, केस सोडलेली, कुंकू, मंगळसूत्र, बांगड्या घातलेली बाई दिसू लागली. नंतर ती बाई भाजलेल्या अवस्थेत दिसायची. देव्हार्‍यातील दिवा हवेतून उडताना दिसायचा, […]